जिंदगी माझी जरी बेकार होती;
वेदनेला केवढा आधार होती.
ऐकली ना हाक या बहि-या जगाने;
या मुक्याची हीच बस तक्रार होती.
सोडल्यावर तत्व सारे जिंकलो मी;
पण खरे तर तीच माझी हार होती.
भेट झाली ना कधी मानव्यतेशी;
माणसे तर भेटली चिक्कार होती.
ठेवले मेघास मी डोळ्यात माझ्या;
आसवे कुठवर मला पुरणार होती.
बेदखल झाली बिचारी पाखरे ती;
जंगलाची जी खरी हकदार होती.
शेवटी मृत्यूच आला वाचवाया;
जिंदगी तर आणखी छळणार होती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा