दोन गझला_मिलिंद हिवराळे


१.

संपली नाही लढाई;
रे नका वाटू मिठाई.

सूर्य झाला भीम अमुचा;
चंद्र झाली अन्‌ रमाई.

तोच मोठ्ठा संत झाला;
काल होता जो कसाई.

शिक्षणाने घात केला;
सर्व बनले डॉन, भाई.

आसवे, तिरडी व खांदे;
एवढी उरते कमाई!


२.

पदव्यांचा वाहत आहे भार हल्ली;
मी आहे शिक्षित, पण बेकार हल्ली.

जागोजागी संसर्गासम पसरला;
पैसे खाण्याचा हा आजार हल्ली.

शत्रूंपेक्षाही वरचढ मित्र झाले;
छातीतच करतात सरळ वार हल्ली.

एकांताच्या तिमिरामध्ये उभा मी;
छायेचाही ना मज आधार हल्ली.

'पैसा आहे कल्पतरू' या युगाने-
अमुच्यावर केला हा संस्कार हल्ली!


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा